वडीरामसगांव :-  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडीरामसगाव येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्री गणेश खेडकर यांनी बाबासाहेब यांचे शिक्षणविषयक विचार सांगितले. बाबासाहेब एक आदर्श विद्यार्थी, शिस्तप्रिय प्राध्यापक, महान अर्थतज्ञ, कुशल संघटक होते. त्यांचे विचार आजच्या काळात भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी उपयोगी असल्याचे प्रतिपादन गणेश खेडकर यांनी केले.

प्रत्येक क्षेत्रात महान कामगिरी करणाऱ्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी मुख्याध्यापक अंगदकुमार भागवत, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार अनिरुद्ध साबळे, राजेश सोनवणे, विलास जाधव, दत्तात्रय शिंदे, विजय खांडेभराड, पी. टी. सातपुते, पी. टी. नाईक, श्रीमती एम. बी. सागडे उपस्थित होते. दत्तात्रय शिंदे यांनी आभार मानले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!