अहिल्यानगर जिल्हा विशेष प्रतिनिधी, शंकर कवाने.
देवळाली प्रवरा
राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील बलात्कार प्रकरणात गजाआड असलेल्या आरोपी बजरंग साळुंके याने बायकोच्या भावाचा खून केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात दिली असताना पोलिसांनी आरोपी साळुंके यास दवणगाव शिवारात घेऊन आले असून सहा महिन्यांपूर्वी पुरलेला मृतदेह उकऱण्याचे काम सुरू आहे.

दवणगाव येथील बजरंग साळुंके याने तीन ते चार अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी पीडित मुलींनी ‘स्नेहालया’च्या मदतीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीस अटकही केली तो कोठडीत असताना चौकशी दरम्यान आरोपी साळुंके याने बायकोचा भाऊ नीलेश सारंगधर याचा खून केल्याची कबुली दिली.
सहा महिन्यांपूर्वी भरदिवसा मेहुना निलेश सारंगधर याचा बजरंग याने गळा दाबून खून केला. त्यानंतर घरालगत खड्डा खोदून त्यात त्याला पुरले. पोलिसांनी आज आरोपी बजरंग साळुंके यास दवणगाव शिवारात आणून मृतदेह पुरलेल्या ठिकाणी शोधमोहीम सुरू केली आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, नायब तहसीलदार संध्या दळवी, आरोग्य अधिकारी खान, ठसेतज्ज्ञ व पोलीस कर्मचारी नदीम शेख, प्रमोद ढाकणे, सतिष कुर्हाडे, अशोक शिंदे, आजिनाथ पाखरे, सुरज गायकवाड, राहुल यादव, गणेश लिपणे, गोवर्धन कदम, महिला पोलीस कर्मचारी वंदना पवार, ग्रामसेविका प्रतिभा पागिरे, डॉ.मासाळ, रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच देवळाली नगरपरिषदेचे कर्मचारी, दवणगावचे सरपंच, पोलीस पाटील यांसह ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. पुरलेला मुतदेह उकऱण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
