अमरावती प्रतिनिधी.

पो.स्टे. गाडगेनगर एन.सी. पथक व मोबाईल मिसींग पथकाची कामगिरी, पो.स्टे. गाडगेनगर अमरावती शहर येथे मोबाईल हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या माध्यमातुन माहे सप्टेंबर २०२५ मध्ये तक्रारदारांचे एकुण २४ मोबाईल ज्याची किंमत ३,६०,००० रु. आहे अश्या सर्व मोबाईलचा शोध घेण्यात गाडगेनगर पोलीस स्टेशनचे एन.सी. पथक आणी मोबाईल मिसींग पथक यशस्वी झाले असुन त्यांच्या या कामगिरीमुळे तक्रारदारांना दिनांक २०.०९.२०२५ रोजी पोलीस स्टेशनला ठाणेदार श्री अतुल वर साहेब व दुय्यम ठाणेदार विजया पंधरे यांचे हस्ते तक्रारदारांना त्यांचे मोबाईल परत करता आले असुन तक्रारदार यांनी त्यांचेकडुन हरवलेले मोबाईल परत सुरक्षित मिळाल्याचे समाधान व्यक्त करून गाडगेनगर पोलीसांचे आभार मानले आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस आयुक्त श्री अरविंद चावरिया साहेब, मा. पोलीस उपआयुक्त श्री. गणेश शिंदे सा. परिमंडळ क्र. १ अमरावती शहर, श्री. सहा. पोलीस आयुक्त सा. राजेंद्र पाटील, सा. गाडगेनगर विभाग अमरावती, वपोनि. श्री अतुल वर सा., क्राईम पोनि. विजया पंधरे मॅडम, प्रशासन पोनि समाधान वाठोरे सा. यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन सदर कार्यवाही पो.स्टे. गाडगेनगर एन. सी. पथक व मोबाईल मिसींग पथकातील पोलीस अंमलदार- सफौ. अशोक वाटाणे ब.नं. १०२३, पोहवा. निलेश जुनघरे ब.नं. १२७२, भारत वानखडे ब. नं. १०५, नपोका. राजेश गुरेले, ब. नं. १४१९, पोशि. सिध्दार्थ शृंगारे ब.नं. ६८२ व महेश शर्मा ब. नं. ५७४ यांनी मिळुन केली आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!