विदर्भ विभागीय उपसंपादक :- विनोद नंदागवळी.

ब्राम्हणवाडा येथील ग्राम पंचायत सचिव राऊत मॅडम यांनी रमाई घरकुल मंजुर करण्यासाठी १०,०००/- रुपयाची मागणी केल्याप्रकरणी वंचित लाभार्थी सिद्धार्थ वानखेडे यांची गट विकास अधिकारी कारंजा यांच्या कडे निवेदनाद्वारे तक्रार सादर, तक्रारदार सिद्धार्थ रामचंद्र वानखडे, हे ब्राम्हणवाडा, ता. कारंजा, जि. वाशिम. येथील कायम रहिवासी यांनी रमाई घरकुल योजनेसाठी फाईल तयार केली, परंतु ब्राम्हणवाडा येथील ग्राम पंचायत सचिव राऊत मॅडम यांनी रमाई घरकुल मंजुर करण्यासाठी १०,०००/- रुपयाची मागणी केली आणि तक्रारदार यांना म्हटले की, तुम्ही १०,०००/- रुपये द्याल तेव्हाच मी ग्राम सभेचा ठराव तुमच्या रमाई घरकुलच्या फाईलला लावणार नाही तर, मी ग्रामसभेचा ठराव देणार नाही.

त्यानंतर तक्रारदार यांनी पंचायत समिती कारंजा येथे जाऊन चौकशी केली असता तक्रारदार यांना असे माहित पडले की, ठराव नसल्यामुळे रमाई घरकुलची फाईल रद्द करण्यात आली आहे. तरी सदर भ्रष्टाचार करणाऱ्या ग्राम पंचायत सचिव राऊत मॅडम यांचेवर कारवाई करून मला ग्राम सभेचा ठराव देऊन, तक्रारदार वानखेडे यांची रमाई घरकुल योजनेची फाईल मंजुर करण्यात यावी अशी विनंती मा. गटविकास अधिकारी साहेब, पंचायत समिती कारंजा, ता. कारंजा, जि. वाशिम. यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे.
आता या भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यावर पंचायत समिती कारंजा येथील गट विकास अधिकारी काय कार्यवाई करतात, वंचित लाभार्थी तक्रारदार सिद्धार्थ वानखेडे यांना न्याय मिळवून देणार का? या कडे समस्त ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
