मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.

शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन आर्थिक मदत मिळावी.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील सर्व मंडळात सततच्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यासाठी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अतिशय जास्त असुन तालुक्यातील सर्व छोटे मोठे तलाव पुर्ण भरलेले आहेत. परीसरातील सर्व नदी / नाल्यास आलेल्या पुरामुळे तसेच सततच्या पावसामुळे तालुक्यातील सर्व गावातील जवळपास ९०% शेतकऱ्यांच्या कापुस, तुर, सोयाबीन, मोसंबी, ऊस व अन्य पिकांचे पुर्णतः नुकसान झालेले आहे.

तसेच अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने काढुन घेतलेला आहे. तसेच काही ठिकाणी घरे पडणे, पाळीव प्राणी वाहून जाणे. काही ठिकाणी जिवीत हाणी देखील झालेली आहे. यावर्षी शेतकऱ्यांच्या होणाऱ्या उत्पादनातही जवळपास ८५ ते ९०% घट झालेली असुन शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांना सरसकट पिकांच्या नुकसानीची आर्थिक मदत देण्यात यावी व ओला दुष्काळ जाहीर करणे बाबत आपले वरीष्ठ कार्यालयात कळविण्याची देखील कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन जालना यांच्यावतीने जालना जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध साबळे, तालुकाध्यक्ष श्रीराम गोफणे तसेच इतर पदाधिकारी यांच्या सोबत घनसांगवी तहसील येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!