जालना प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.

आज दिनांक ११ मार्च २०२५ रोजी लाच घेताना रंगेहाथ अटक झालेले भास्कर प्रभाकर हरणे, वय 35 वर्षे, पद – कृषी सहाय्यक ( वर्ग 3), नेमणूक तालुका कृषी अधिकारी कार्यालय घनसावंगी, तालुका- घनसावंगी, जिल्हा – जालना यांनी तक्रारदार यांचे मौजे शिंदे वडगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना शिवार शेती गट क्रमांक 238 मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना मधील सिताफळ फळबाग पिकाचे लागवडी साठीचे फोटो जिओ टॅगिंग करण्यासाठी व फळबाग मस्टर मंजूर करण्यासाठी भास्कर हरणे यांनी तक्रारदार यांना 5,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 3,000/- रुपये स्विकारण्याचे मान्य करून लाचेची रक्कम 3,000/- रुपये पंचा समक्ष स्विकारताना रंगेहात पडण्यात आले असून पो.स्टे घनसावंगी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी यांचे घराची झडती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

आलोसे भास्कर हरणे यांना रंगेहाथ पकडले त्यावेळी भास्कर हरणे यांचे अंग झडती घेण्यात आली यामध्ये 1 Redmi व 1 Vivo कंपनीचे दोन मोबाईल फोन किंमत 30,000/रुपये व रोख रक्कम रुपये 1895/- मिळून आलेल्या आहेत. तसेच आरोपी यांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असुन पुढील निरीक्षण करुन तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.

हा सापळा यशस्वी करण्यासाठी

अधिकारी- शंकर म.मुटेकर
पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. जालना. मोबाईल 9767108455.

मार्गदर्शक- श्री. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर. 9923023361

श्री.मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर मोबाईल- 9881460103

श्री. बाळू जाधव, पो. उप अधिक्षक, ला. प्र. वि. जालना
मो.न. 9881463365

यांचे मार्गदर्शनाखाली सापळा पथक -पोह/तिडके, पो.अं.गजानन कांबळे, गजानन खरात, भालचंद्र बिनोरकर ला. प्र. वि. जालना यांनी चोख कामगिरी बजावत आरोपीला रंगेहाथ पकडले.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांचेकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
*भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास*
*टोल फ्री क्र:- 1064
*पोलीस अधीक्षक, लाप्रवि.छत्रपती संभाजीनगर :-9923023361
*पोलिस उप अधीक्षक लाप्रवि जालना – 9881463365.
पोलिस निरीक्षक लाप्रवि जालना – 9767108455, 7057389755

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!