धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना बलिदान दिनानिमित शिवबाचा मावळा संघटने च्या वतीने अभिवादन
कोल्हापूर प्रतिनिधी प्रदीप जाधव
11 मार्च 1689 रोजी स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज यांची क्रूर औरंगजेब ने हत्या केली होती. या दुःखद घटनेचे स्मरण म्हणून शिवबाचा मावळा संघटने चे संस्थापक ॲड.अमोल माने, जयदीप सरवदे, विनोद जाधव तसेच इतर पदाधिकारी गेली 16 वर्ष मुंडण करून अभिवादन करतात.
आजही बलिदान दिनानिमित मुंडण करून पापाची ती कटी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शाहीर योगेश यांचा ” देश धरम पे मिटनेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी, परम प्रतापी एक शंभू राजा था ” हा पोवाडा म्हणण्यात आला.
यावेळी ॲड अमोल माने, जयदीप सरवदे, विनोद जाधव, आसिफ शेख, चंद्रकांत आण्णा पाटील, गणेश मोरे, दत्तात्रय कोथमीरे आदी उपस्थित होते.
