जळगांव प्रतिनिधी

दिनांक 9 मार्च 2025 रविवार रोजी सकल लेवा महिला मंडळ, भुसावळ आयोजित जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम छान पार पडला.
अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री माननीय नामदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची उपस्थिती होती. महिलांना व समाज बांधवांना त्यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघातर्फे त्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात सामाजिक मागण्यांचा समावेश आहे.
1. आपल्या समाजाचा मानबिंदू बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे.
2. वाघूर जलाशयाला संत तोताराम महाराज यांचे नाव देण्यात यावे.
3. लेवा पाटीदार समाजाची बोली भाषेला शासनाचा भाषिक दर्जा देऊन समाजाला अल्पसंख्यांक दर्जा शासनातर्फे देण्यात यावा.
3. भुसावळला मेमु गाड्या डब्याचा प्रकल्प व रेल्वे इंजिनियरिंग कॉलेज व्हावे.
4. विवाहपूर्व व विवाहानंतरचे मूळ मुलींना समुपदेशन केंद्र विद्यापीठात सुरू करावे.
5. स्थानिक रोजगारासाठी भुसावळ, मलकापूर, बुलढाणा, जळगाव क्षेत्रात मल्टिनॅशनल कंपनी, इलेक्ट्रॉनिक. कॉम्पोनन्ट, उत्पादक हब मंजूर करावा.
6. ग्रामीण भागातील महिला भगिनींसाठी खाद्य पदार्थ, भाज्या, फळे वाळवण तयार करण्यासाठी व रोजगारा साठी वाळवण केंद्र मंजूर करावे.
या वरील मागण्यांचा समावेश आहे.


निवेदन देताना महासंघाचे अध्यक्ष श्री अरुण बोरोले, कोषाध्यक्ष डॉ मिलिंद पाटील, भोरगाव पंचायत कुटुंब नायक श्री ललित दादा पाटील, माजी आमदार श्री नीलकंठ फालक, श्री दिनेश भंगाळे, श्री दिनेश चौधरी, श्री सुहास चौधरी, श्री रघु शेठ चौधरी, सौ मंगला पाटील, सौ.आरती चौधरी, श्रीवचंद्रकांत चौधरी, श्री शरद फेगडे, श्री सुधीर पाटील, श्री परीक्षित बऱ्हाटे, श्री चेतन पाटील आदी भोरगाव पंचायत सदस्य यांची तसेच अनेक समाज बांधव आणि भगिनींची उपस्थिती होती.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!