माळशिरस तालुका प्रतिनिधी, ओमकार निंबाळकर

आज दिनांक ०८/०३/२०२५ रोजी राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २ अकलूज, ता. माळशिरस जि.सोलापूर या कार्यालयास मानव सेवा सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सोलापूर जिल्हा अध्यक्ष ओंकार निंबाळकर व पंढरपूर तालुका अध्यक्ष दत्तात्रय देठे यांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयास भेट देवून या कार्यालयातील पथकाने केलेल्या त्यांच्या कार्यक्षेत्रातील सांगोला, माळशिरस, पंढरपूर, माढा, बार्शी, करमाळा या तालुक्यातील अवैद्य मद्य विक्री व वाहतूक करणाऱ्यांचे विरुद्ध कडक कारवाई केल्याने अवैद्य धंदेवालेंचे धाबे दणाणले आहेत.

सदर कारवाई मुळे तालुक्यातील सामान्य जनता खुष आहे. तरी या पुढे आशाच मोहीमा आणखी प्रभावीतपणे राबवण्यात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त करुन श्री ओंकार निंबाळकर मानव सेवा सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा अध्यक्ष व श्री. दत्तात्रय देठे, पंढरपूर तालुका अध्यक्ष यांनी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.२ या कार्यालयातील पथकातील  निरीक्षक – आर. के. पवार साहेब व सर्व अधिकारी कर्मचारी यांचा करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!