जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.
चोपडा येथे मराठा स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठा प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास उपस्थित राहून खेळाडू व आयोजकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटन सोहळ्याला राज्यसभा खासदार तथा सुप्रसिद्ध सरकारी वकील ॲड. उज्ज्वलजी निकम, महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष श्री. रोहितदादा निकम यांच्यासह प्रमुख प्रायोजक, समाजातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, मराठा स्पोर्ट्स असोसिएशनचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सांगितले की, समाजातील एकोपा व एकता अधिक दृढ करण्यासाठी आणि युवकांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण करण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणे अत्यंत आवश्यक आहे. मैदानी खेळांचे महत्त्व वाढविण्यासाठी आणि चोपडा व परिसरातील ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य, आपली प्रतिभा दाखविण्यासाठी मराठा प्रीमियर लीग हे निश्चितच एक उत्तम आणि प्रभावी व्यासपीठ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
या स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना मोठे प्रोत्साहन मिळेल आणि चोपडा परिसरातून राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्तम क्रिकेटपटू घडतील, अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.
