अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने.
राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि कृषी विभाग, आत्मा (अहिल्यानगर) यांच्या संयुक्त विद्यमाने नव्याने स्थापन झालेल्या ‘कृषी प्रक्रिया उद्योजक शास्त्रज्ञ मंच’च्या अध्यक्षपदी पिंपळगाव फुणगी येथील प्रयोगशील शेतकरी आणि मार्गदर्शक प्रा. सतीश राऊत सर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे राहुरी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे, शेतमालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणे आणि ग्रामीण युवकांना शेतीपूरक उद्योगाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, हा या मंचाचा मुख्य उद्देश आहे. प्रा. राऊत यांच्या अभ्यासपूर्ण आणि प्रयोगशील नेतृत्वाखाली हा उद्देश निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या अभिमानास्पद निवडीबद्दल ढूस परिवाराच्या वतीने प्रा. सतीश राऊत यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. यावेळी वैभव ढूस लिखित ‘धर्मो रक्षती रक्षितः’ हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.
या प्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब भिमराज ढूस, त्रिंबकराज पायी दिंडी सोहळ्याचे प्रमुख तथा माजी नगरसेवक सचिन सिताराम ढूस, प्रसिद्ध प्रेस फोटोग्राफर जालिंदर मुसमाडे, शेतीनिष्ठ शेतकरी राजाराम खेवरे, बाळासाहेब गाढे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. सतीश राऊत यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
