विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

फत्तेपूर, ता. जामनेर | जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे बोदवड – फत्तेपूर राज्य मार्ग ४६ च्या रस्त्याचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. याच रस्त्याच्या कामादरम्यान रांजणी – बेटावद रस्त्यावर एका भीषण अपघातात परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २६ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास रांजणी – बेटावद रस्त्यादरम्यान संबंधित कंपनीचा कॅम्प असून, तेथून सुमारे एक किलोमीटर अंतरावर रांजणी गावाकडे डंपर (क्र. एमएच ०५ जीए ३०६५) मागे घेत असताना चालकाचा निष्काळजीपणा समोर आला. रस्त्यावर काम करीत असलेल्या संतोषकुमार हरिनंदनसिंह (वय ३९, रा. परसागढी, जि. सुपौल, बिहार) या मजुराला डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी होऊन त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

या प्रकरणी अवधेश गोनर पासवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फत्तेपूर पोलीस ठाण्यात डंपरचालक आकाश प्रल्हाद चोभे (रा. सारगाव, ता. जामनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉ. गणी तडवी आणि पो.कॉ. मुकेश पाटील हे करीत आहेत.

दरम्यान, शवविच्छेदनानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी बिहारमधील त्यांच्या मूळगावी पाठविण्यात आला आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!