संस्कार, स्नेह आणि नात्यांचा उत्सव – वंदना बाविस्कर

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.

अमर संस्था, चोपडा संचलित प.पू. साने गुरुजी आदर्श बालवाडी व बालमोहन प्राथमिक विद्यामंदिर, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी आजी-आजोबा मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी वंदना जगन्नाथ बाविस्कर तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त केंद्रप्रमुख अशोक शंकर साळुंखे उपस्थित होते.

विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मान्यवरांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. उपस्थित सर्व आजी-आजोबांच्या चरणी नातवंडांनी चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला. सरस्वती माता व साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला औपचारिक सुरूवात झाली.

आजी-आजोबा आपल्या नातवंडांसोबत बोलीभाषेतील गीतांवर थिरकले, पारंपारिक खेळ खेळले आणि मनोगत व्यक्त करताना भावनाविवश झाले. संपूर्ण वातावरण स्नेह आणि आनंदाने भारून गेले.

अध्यक्षा वंदना बाविस्कर यांनी आपल्या भाषणात म्हटले, “आजी-आजोबा मेळावा दोन पिढ्यांना जोडणारा पूल आहे. धकाधकीच्या जीवनात नातवंडांसोबत वेळ घालवल्यास ते सुख जगावेगळे असते. शरीराची साथ नसल्याने चिडचिड होते, एकटेपणा जाणवतो. यावर एकच उपाय म्हणजे नातवंडांसोबत प्रसन्न राहणे.”

कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक बालवाडीच्या मुख्याध्यापिका रेखा नेवे यांनी केले. सूत्रसंचालन मयुरेश्वर सोनवणे यांनी समर्थपणे पार पाडले. बालमोहन प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक प्रदीप चौधरी, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच अरुणोदय कॉलनी परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आवर्जून उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक संघाने लहान लेकरांना खाऊ वाटपही केले.

प.पू. साने गुरुजी आदर्श बालवाडी व बालमोहन प्राथमिक विद्यामंदिराच्या सर्व सहकाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!