जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

किनगाव (ता. यावल) विजयादशमीच्या पवित्र पर्वावर किनगाव येथे निघालेल्या पथसंचलनाला विरोध करून पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असताना, आज या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे.

भाजपचे आक्रमक नेते तथा माजी खासदार श्री. किरीटजी सोमय्या यांनी आज किनगावला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांवर दगडफेक करण्यापर्यंत मजल गेलेल्यांना सोडणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

पाहणी दौऱ्यात या मान्यवरांचा सहभाग

या दौऱ्यात रावेर-यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. अमोलदादा जावळे, भाजपा जळगाव जिल्हा (पूर्व) जिल्हाध्यक्ष श्री. चंदूभाऊ बाविस्कर, जिल्हा सरचिटणीस श्री. प्रफुल्लजी जवरे, भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक श्री. दीपकदादा सूर्यवंशी, मंडळाध्यक्ष सागरभाऊ कोळी, अनिलदादा पाटील यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दौऱ्यादरम्यान किरीटजी सोमय्या यांनी माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. संजयजी पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून लगतच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

पोलिसांकडून आढावा, पुनरावृत्ती रोखण्याच्या सूचना

यावेळी श्री. सोमय्या यांनी पोलीस प्रशासनाकडून घटनेचा संपूर्ण आढावा घेतला. आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती घेत भविष्यात किनगावसारख्या शांत गावात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिसांना कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

विजयादशमीसारख्या हिंदू सणावर होणारा हा हल्ला सहन केला जाणार नाही, अशी भूमिका यावेळी उपस्थित नेत्यांनी मांडली.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!