जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

यावल तालुक्यातील किनगाव येथे पथसंचलन व कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कारवाईदरम्यान झालेल्या दंगलीत दोन पोलीस अंमलदार गंभीर जखमी झाले. या जखमी जवानांची जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मा. श्री. श्रीकांत धिवरे यांनी तातडीने रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन भेट घेत त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.

या दुर्दैवी घटनेत दोन पोलीस बांधव गंभीर जखमी झाले आहेत.

१. पो.ना. ३३९५ पुरुषोत्तम पाटील (नेमणूक: यावल पोलीस स्टेशन) – दगडफेकीत त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असून, त्यांच्यावर जळगाव येथील आरुषी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

२. पो.शि. २९९ दानिश हारून तांबोळी (नेमणूक: पोलीस मुख्यालय, आरसीपी) – त्यांच्या कमरेला दगड लागल्याने गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर जळगाव येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

घटना घडताच पोलीस प्रशासनाने जखमी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय उपचारांची तातडीने दखल घेतली. स्वतः पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दोन्ही रुग्णालयात जाऊन उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून सविस्तर माहिती घेतली व जखमी जवानांना धीर देत, “खाकीच्या पाठीशी संपूर्ण जिल्हा पोलीस दल खंबीरपणे उभा आहे,” असा विश्वास दिला.

पोलीस अधीक्षकांच्या या संवेदनशील भेटीमुळे पोलीस दलाचे मनोबल उंचावले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!