नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर दि. २२ ऑक्टोबर २०२६ : टोकर तलाव येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात बालविवाह, बालमजुरी, ऑनलाइन बालशोषण, बालसुरक्षा, व कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधिनियम, हुंडा प्रतिबंधक अधिनियम यांची जनजागृती या विषयांवर जनजागृती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
यावेळी चाइल्ड हेल्पलाइन प्रतिनिधी भाग्यश्री पाटील व महिला समुपदेशन केंद्राचे समुपदेशक मनीष कैलास पाटील यांनी बालहक्क, POCSO अधिनियम २०१२, बालकांचे कायदेशीर संरक्षण तसेच चाइल्ड हेल्पलाइन १०९८ व आपत्कालीन हेल्पलाइन ११२ याबाबत मार्गदर्शन केले.

या उपक्रमासाठी महिला व बालविकास विभागांतर्गत मान्यताप्राप्त संस्था संस्कृती बहुउद्देशीय सेवा मंडळाचे अध्यक्ष मा. मिलिंद धोंदरे व सचिव मा. सुजाता साळवे यांचे मार्गदर्शन लाभले.
या वेळी समुपदेशिका सरला पानपाटील, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शालिनी पाटील, शिक्षकवृंद व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
“बालसुरक्षितता ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे,” हा महत्त्वपूर्ण संदेश या जनजागृती प्रशिक्षणातून देण्यात आला.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!