जळगाव जिल्हा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.

 जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याचे भूमिपुत्र, राज्यसभा खासदार तथा ज्येष्ठ विधिज्ञ आदरणीय ॲड. उज्ज्वल निकम यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित ‘प्रहार – The Untold Story of Ujjwal Nikam’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन माता-भगिनींसाठी आशा टॉकीज, चोपडा येथे २४ ऑक्टोबर रोजी यशस्वीपणे पार पडले. श्री. रोहितदादा निकम फाउंडेशनच्या वतीने या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासारख्या महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये त्यांनी निर्भीडपणे बजावलेली भूमिका आणि न्यायासाठीचा त्यांचा अथक संघर्ष ‘प्रहार’ चित्रपटातून प्रभावीपणे उलगडतो. या उत्तुंग कार्याचा गौरव होत असताना महिला वर्गाकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण चित्रपटगृह ‘हाऊस फुल’ झाले. उपस्थितांकडून अभिमानाच्या आणि प्रेरणादायी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त झाल्या.

या प्रसंगी संध्याताई महाजन, वैशालीताई भावसार, पूजा देशमुख, गजेंद्र जैस्वाल, राकेश पाटील, अशोक शिंपी, मितेश भावसार, नरेश महाजन, स्वामी पाटील, गौरव सोनार आणि सागर महाजन उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन संध्याताई महाजन, वैशालीताई भावसार, तेजस्विनी सिद्धार्थ, राधिका शिंपी, मीनाताई शिरसाठ, कविता माळी, कमलताई, लताताई खैरनार, वैशाली माळी, रत्नाबाई लोहार, दिपाली पाटील, कविता पाटील, सविता परदेशी, भारती खैरनार, पूनम मराठे, लताबाई बुआ आणि छाया पाटील यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले.

न्यायासाठीच्या संघर्षाची ही प्रेरणादायी गाथा सर्वांनी आवर्जून पाहावी, अशा भावना चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!