जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.
चोपडा बस आगारात बसची संख्या कमी असल्याने विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. या मागणीची दखल घेत आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
या पाठपुराव्याला यश आले असून आज चोपडा आगारात ११ नवीन अत्याधुनिक आणि अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण अशा राजमाता जिजाऊ बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे व माजी आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते चोपडा आगारात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
वर्षभरात ४६ बसेसची भर
आतापर्यंत आमदार अण्णासाहेबांच्या प्रयत्नातून ३५ बसेस मंजूर झाल्या होत्या. आजच्या ११ बसेस मिळून या एका वर्षातच चोपडा आगाराला एकूण ४६ नवीन बसेस मिळाल्या आहेत.
यामध्ये २० ए.सी., १० डिझेल, ५ राजमाता जिजाऊ आणि आजच्या ११ राजमाता जिजाऊ अशा बसेसचा समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण आहे.
यावेळी बोलताना आमदार सोनवणे म्हणाले, “नवीन बसेस प्रवाशांच्या सेवेत रुजू झाल्यामुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ होईल. राज्य सरकारने ५,००० नवीन बसेस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली असून यातील जास्तीत जास्त बसेस आपल्या विभागात मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. परिवहन हा दळणवळण, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा घटक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सरकारने ज्येष्ठांना मोफत प्रवास आणि महिलांना अर्धे तिकीट सवलत देऊन सर्वसामान्यांना पुन्हा एस.टी.कडे वळवले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाले आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या सहकार्याने यापुढेही अधिकचा निधी आणण्याचा प्रयत्न राहील.”
यावेळी पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील, शहर पोलीस निरीक्षक पवन देसले, उपनगराध्यक्ष पंकज बोरोले, मंगलताई पाटील, शिवराज पाटील, प्रताप आण्णा पाटील, प्रकाश रजाळे, नगरसेवक दिपक पाटील, हनिफ सत्तार, आगार व्यवस्थापक संदेश क्षीरसागर, चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी, अधिकारी, पत्रकार बांधव, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
