ज्ञानाची ओढ, संस्कारांची जोड — चिमुकल्यांनी टाकले उज्ज्वल भविष्याकडे पहिले पाऊल
चोपडा तालुका प्रतिनिधी
एम.व्हि.ए. संचलित पोदार स्कूल, गरताड रोड, चोपडा येथे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाची मंगलमय सुरुवात करणारा विद्यारंभ संस्कार सोहळा सोमवार दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

ज्ञान, संस्कार आणि शिक्षणाच्या दिशेने पहिले पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्यांसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला. लहानग्यांच्या निरागस चेहऱ्यावरील हास्य आणि पालकांच्या डोळ्यातील आनंदाने शाळेचे वातावरण प्रसन्न झाले होते.
या कार्यक्रमाला कुरवेल येथील माजी पोलीस पाटील हुकुमचंद पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर शाळेच्या चेअरमन सुनिता पाटील, सेक्रेटरी डॉ. विजय पाटील आणि मुख्याध्यापिका भारती पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी शिक्षिका मोनिका सरवणे, मनीष पाटील, प्रविण महाजन, जयश्री पाटील, उर्वशा पाटील यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होता. शिक्षकेतर कर्मचारी जुलाल पाटील, मंगला पाटील आणि पूनम पाटील यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने पालक उपस्थित राहिल्याने सोहळ्याची शोभा द्विगुणित झाली.
विद्यारंभ संस्कार हा बालकांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या संस्कारातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी गोडी, ज्ञानाची जिज्ञासा आणि चांगल्या संस्कारांची बीजे रोवली जातात, असा संदेश यावेळी देण्यात आला.
“प्रत्येक महान प्रवासाची सुरुवात एका छोट्याशा पावलाने होते!” या उक्तीप्रमाणे या सोहळ्याने चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची सुंदर सुरुवात करून दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी एम.व्हि.ए.च्या पोदार स्कूलच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच सहभागी झालेल्या प्रत्येक बालकाला सरस्वती, लक्ष्मी व गणेशजी यांची प्रतिमा, मॅजिक बुक, डायरी, पेन्सिल, खोडरबर अशा मजेदार भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
