नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर.
नंदुरबार: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या पशुधन चोरीच्या घटनांमुळे शेतकरी हवालदिल झाला होता. या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलिसांनी मोठी कामगिरी करत पशुधन चोरणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने सापळा रचून या टोळीतील दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या ७ पशुधन चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. चोरीला गेलेली जनावरे परत मिळण्याची आशा निर्माण झाल्याने बळीराजामध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पुढील तपास नंदुरबार पोलीस करत आहेत.
