धुळे जिल्हा प्रतिनिधी

मुलगी वाचवा मोहिमेंतर्गत धुळे जिल्हा प्रशासनाने बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात रोखण्यासाठी मोठे आणि कडक पाऊल उचलले आहे.

जिल्ह्यात कुठेही अवैधरित्या गर्भलिंग निदान (Sonography द्वारे मुलगा-मुलगी तपासणी) किंवा त्यावरून गर्भपात केला जात असल्याची ठोस माहिती मिळाल्यास, अशी माहिती देणाऱ्या नागरिकाला जिल्हा प्रशासनाकडून 1 लाख रुपयांपर्यंत रोख बक्षीस दिले जाणार आहे.

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने अधिकृत घोषणा केली आहे.

माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त राहणार

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भीतीशिवाय पुढे येऊन अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही काळात मुलींच्या जन्मदरात घट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. अवैध सोनोग्राफी सेंटर आणि गर्भपात करणाऱ्यांवर कडक नजर ठेवली जाणार असून, दोषींवर PCPNDT कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

नागरिकांनी अवैध गर्भलिंग निदानाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा संबंधित तहसील कार्यालयाला द्यावी.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!