साक्री, धुळे जिल्हा प्रतिनिधी

बुधवार, 22 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या जिल्हा मेळाव्यात महाराष्ट्राचे राजशिष्टाचार व पणन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी प्रदेश सरचिटणीस आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

धुळे जिल्ह्याच्या राजकारणात आज एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील परिचित सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाटील यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

पिंपळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या अविनाश पाटील यांचा पिंपळनेर परिसरात मोठा जनसंपर्क आहे. त्यांच्या या निर्णयामुळे साक्री-पिंपळनेर परिसरातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ताकद आणखी वाढली असल्याचे बोलले जात आहे.

यावेळी बोलताना अविनाश पाटील म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याच्या विकासात्मक धोरणावर विश्वास ठेवून तसेच भाजपच्या नेतृत्वावर श्रद्धा ठेवून मी हा निर्णय घेतला आहे. पिंपळनेरच्या विकासासाठी आता भाजपच्या माध्यमातून अधिक जोमाने काम करणार.”

त्यांच्या प्रवेशामुळे साक्री तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे असून, विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पिंपळनेर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!