चोपडा प्रतिनिधी

चोपडा शहरातील गट क्रमांक 1101 येथे उभारण्यात आलेल्या कथित अनधिकृत संकुलावर अखेर प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या संकुलातील दुकानांचे बांधकाम हे अनधिकृत असल्याची तक्रार विनायक पाटील यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने संबंधित संकुलाची पाहणी केली असता बांधकाम अनधिकृत आढळल्याने कारवाईचे आदेश देण्यात आले.

या आदेशानंतर आजपासून या संकुलातील दुकानांचे अतिरिक्त बांधकाम कापून लहान करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जेसीबी आणि कामगारांच्या सहाय्याने दुकानांच्या समोरील अनधिकृत भागावर कारवाई सुरू आहे.

विनायक पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ही कारवाई सुरू झाल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. या कारवाईमुळे शहरातील इतर अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

पुढील कारवाई काय होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!