चोपड्यात गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक; 4 जिवंत काडतुसे, 5 मोबाईल जप्त

चोपडा प्रतिनिधी

चोपडा शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. शहरातील धनवाडी रोडवरील ग्रामसेवक कॉलनी परिसरातील शशिकांत नगर येथे विनापरवाना गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या 24 वर्षीय तरुणाला चोपडा शहर पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शशिकांत नगर परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडे झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी बनावटीचा कट्टा, 4 जिवंत काडतुसे आणि 5 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो हा गावठी कट्टा कशासाठी बाळगत होता? त्याचा आणखी काही गुन्ह्यात सहभाग आहे का? याचा तपास चोपडा शहर पोलीस करत आहेत.

या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, शहर पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!