जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रिंग रोडवरील मुख्य प्रशासकीय इमारतीत येत्या रविवारी एक ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रविवारी करण्यात येणार आहे.
सहकार क्षेत्रातील भरीव योगदान आणि जिल्हा बँकेच्या विकासातील भूमिकेबद्दल कृतज्ञता म्हणून बँक प्रशासनाकडून हा पुतळा उभारण्यात आला आहे. या अनावरण सोहळ्यासाठी राज्यभरातील सहकार आणि राजकारणातील अनेक बडे नेते, मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली आहे.
रिंग रोडवरील मुख्य इमारतीच्या प्रांगणात हा सोहळा दिमाखात होणार असून, यानिमित्ताने जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा कार्यक्रम केवळ अनावरणापुरता मर्यादित न राहता, आगामी काळातील राजकीय समीकरणांची दिशा ठरवणारा ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या सोहळ्याची जय्यत तयारी जिल्हा बँक प्रशासनाकडून सुरू असून, कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
