जळगाव प्रतिनिधी

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. आरोपी पतीला न्यायालयाने जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दि. 21 ऑक्टोबर रोजी या खटल्याचा निकाल आला.

न्यायालयात सादर झालेल्या माहितीनुसार, आरोपी पती हा नेहमीच आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच संशयातून सतत वाद होत होते. याच वादातून त्याने टोकाचे पाऊल उचलत पत्नीचा खून केला होता. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होती. सरकारी पक्षातर्फे भक्कम पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारे आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

या निकालामुळे चारित्र्याच्या संशयापोटी महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली असून न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!