जळगाव प्रतिनिधी

जळगाव शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधाच्या वादातून हा गोळीबार झाल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भावाच्या प्रेमसंबंधाला विरोध असल्याच्या कारणातून अनिकेत मधुकर सपकाळे याने आपल्या साथीदारासह पाठलाग करून गोळीबार केला. या गोळीबारात एक ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे.

मध्यरात्री अचानक गोळीबाराचा आवाज झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी अनिकेत सपकाळे आणि त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!