जळगाव प्रतिनिधी

दसऱ्याच्या रात्रीचा उत्सव रक्तरंजित झाला आहे. जळगाव शहरालगत असलेल्या खेडी बुद्रुक – माऊली नगर येथे सुरू असलेल्या दसरा-गरबा कार्यक्रमात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाने एकाचा जीव घेतला आहे.

काय घडले नेमके?

माऊली नगर येथे दसऱ्यानिमित्त गरबा कार्यक्रम सुरू होता. यावेळी दोन गटात क्षुल्लक कारणावरून शाब्दिक वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेले किरण विठ्ठल पाटील (वय 44) यांच्यावर आरोपींनी चॉपर आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला केला.

या हल्ल्यात किरण पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेले किशोर छगन पाटील (वय 35) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांची कारवाई –

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मुख्य आरोपी मयूर चैत्राराम जाधव याला अटक केली असून, इतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी 3 विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

दसऱ्यासारख्या पवित्र सणाच्या रात्री घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला असून, परिसरात तणावाचे वातावरण आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!