विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

यावल : यावल तालुक्यातील यावल-चोपडा मार्गावरील साकळी गावाजवळ असलेल्या साईराम जिनिंग समोर कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील तिघे तरुण जखमी झाले असून, त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साकळी गावानजीक साईराम जिनिंग आहे. या ठिकाणी यावलकडून चोपड्याच्या दिशेने जाणारी कार क्रमांक एम.एच. ०५ बी.एल. ४७४९ चे चालक विनोद कुमार हे श्रीक्षेत्र मनुदेवीकडे जात होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने साकळीकडून यावलकडे दुचाकी क्रमांक एम.पी. ६८ झेड.एफ. १०३७ वरून प्रवीण किशोर तेली (वय २१), हर्षल राजेंद्र माळी (वय १७) आणि तय्यब राजू तडवी (वय १६, तिघे रा. साकळी) हे तिघे जात होते.

दरम्यान, साईराम जिनिंग समोर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघातात दुचाकीवरील तिघेही जखमी झाले.

जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर प्रवीण तेली याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि हर्षल माळी यालाही डोक्याला दुखापत झाल्याने दोघांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!