विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

नंदुरबार : घरफोड्यांचा छडा, अल्पवयीनाकडून शस्त्रसाठा जप्त

नंदुरबार : शहरातील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत चौघांना ताब्यात घेण्यात आले असून, यातील एका १७ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाकडून गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेण्यात आले. तळोदा येथील विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या घराची झडती घेतली असता कपाटात लपवून ठेवलेला गावठी कट्टा व दोन काडतुसे आढळून आली.

जप्त केलेल्या कट्ट्याची किंमत २५ हजार रुपये असून, काडतुसांची किंमत ४ हजार रुपये आहे. याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांनी ९० हजार रुपयांची रोख रक्कम, चांदीची तीन नाणी आणि ८० हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त केली आहे. तर उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुसऱ्या गुन्ह्यात ३२ हजार २०० रुपये किमतीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या आणि १० हजार रुपयांचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!