नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर.
नवरात्र उत्सवात गरबा, दांडिया आणि देवी दर्शनासाठी येणाऱ्या हजारो महिलांच्या सुरक्षेसाठी नंदुरबार पोलीस दलाने विशेष तयारी केली आहे. महिला सुरक्षेसाठी प्रसिद्ध असलेले ‘दामिनी पथक’ यंदा अधिक सतर्क आणि अंडरकव्हर मोडमध्ये काम करणार आहे.
काय आहे कारवाई?
पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, साध्या वेशातील महिला पोलीस कर्मचारी गरबा मंडळाच्या आतच तैनात असणार आहेत. कोणी टवाळखोरी किंवा छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला जागीच पकडून कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
या पथकासाठी खास ‘दामिनी पथक – नंदुरबार पोलीस’ लिहिलेल्या गाड्या आणि दुचाकींवरून दिवसा-रात्री गस्त घातली जाणार आहे. गरबा मंडळ परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा सादा ड्रेस मधील पहारा असेल.
नंदुरबार पोलिसांचे आवाहन:
“सर्व महिलांनी निर्भयपणे नवरात्रीचा आनंद घ्यावा. तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही तुमच्याच सोबत आहोत. काही गैरप्रकार दिसल्यास तात्काळ 112 वर संपर्क साधा.”
🙏 सुरक्षित नवरात्री, निर्भय महिला!
💙 नंदुरबार पोलीस – महिला सुरक्षा, आमची जबाबदारी!
