फत्तेपूरच्या दुर्गम वनक्षेत्रात स्थानिक गुन्हे शाखा व वन विभागाची संयुक्त धडक कारवाई; २३१० किलो गांजा जप्त

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

धुळे – जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांना मोठे घबाड हाती लागले आहे. फत्तेपूर, मांडणीपाडा आणि वाकपाडा शिवारातील दुर्गम वनक्षेत्रात सुरू असलेल्या गांजाच्या अवैध शेतीवर पोलिसांनी छापा टाकून तब्बल ५ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून सुमारे ८ ते १० एकर परिसरात अत्यंत गुप्तपणे गांजाची लागवड करण्यात आली होती. गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा, धुळे पोलीस आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने या भागात छापा टाकला. या कारवाईत २ हजार ३१० किलो ८६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, जप्त केलेल्या गांजाची बाजारातील किंमत ५ कोटी ७७ लाख ७४ हजार ५०० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वन विभागाच्या जमिनीचा गैरवापर करून हा अवैध धंदा राजरोसपणे सुरू होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, ही लागवड कोणी केली आणि यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!