जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.
नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वावर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) ने महिला सन्मानाचा आगळा वेगळा आदर्श घालून दिला आहे.
महावितरण मुख्यालयाच्या संदर्भ क्र. औसंवि/ब/सन्मान सौदामिनीचा/34938 दि.09.10.2026 आणि मंडळ कार्यालय जळगाव यांच्या दि.14.10.2026 रोजीच्या निर्देशानुसार जळगाव विभागीय कार्यालयाच्या वतीने “सन्मान सौदामिनीचा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दि. 16 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 4.00 वाजता जळगाव विभागीय कार्यालयात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विभागीय कार्यालय व त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महावितरणमध्ये कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या विविध कलागुणांचा आणि क्षमतांचा सन्मान करणे हा होता.
समाजासाठी अभिमानाचा क्षण
या गौरवशाली सोहळ्यात आपल्या समाजातील कर्तृत्ववान महिला सौ. मनीषा मेथाळकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव होणे ही केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
महावितरणने महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद असून, यामुळे इतर महिलांनाही प्रेरणा मिळणार आहे.
सौ. मनीषा मेथाळकर यांचे या विशेष सन्मानाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांनी आपल्या कर्तृत्वातून अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी आणि समाजातील इतर महिलांसाठी प्रेरणास्थान ठरावे, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.
