खाद्यपदार्थांच्या आस्थापनांची तपासणी; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जप्तीची कारवाई

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी – राम ठक्कर (9175431411)

शहरात नवरात्रोत्सवादरम्यान खोडाईमाता यात्रेत अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. यात्रेतील हॉटेल्स व मिठाईच्या दुकानांची तपासणी करून खाद्यपदार्थांच्या आस्थापनांमधून संशयास्पद खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

गोड शेव व जिलेबीचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा मानक कायद्यानुसार संबंधितांवर पुढील कारवाई करण्यात येईल.

जप्त करण्यात आलेला माल

1. गोड शेव : ४८४ किलो

2. जिलेबी : १५ किलो

खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या परवान्यांची तपासणी

यात्रेतील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानदारांकडे आवश्यक परवाने आहेत किंवा नाहीत, याबाबतही तपासणी करण्यात आली.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई

अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

अन्न व्यावसायिकांना प्रशासनाचे आवाहन

जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा मानक कायदे आणि नियमांचे पालन करून स्वच्छ व सुरक्षित वातावरणात व्यवसाय करावा. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!