अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने.
दि. १०-१०-२०२६ रोजी चिंचविहिरे, ता. राहुरी येथे ग्रामपंचायत मार्फत डेंग्यू डास प्रतिबंधक धूरफवारणी करण्यात आली. वाढत्या डेंग्यू आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावात घराघरात, शाळेत आणि सार्वजनिक ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली.
फ्रिजच्या मागे, गोड पाण्याच्या टाक्या, टायर आणि साचलेल्या पाण्यावरील डास नष्ट करणे हा या फवारणीचा मुख्य उद्देश असून गावात डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने सतर्कता दाखवली आहे.
