जळगाव / मेहरूण : भुलाबाई महोत्सवाच्या औचित्य साधत मुलींच्या आरोग्य संवर्धनासाठी जळगाव शहर महानगरपालिका आणि मुलतानी हॉस्पिटलने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थिनींसाठी धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण शिबिर उत्साहात पार पडले.

केवळ उत्सव साजरा न करता मुलींच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. शिक्षणासोबतच आरोग्याची काळजी तितकीच महत्त्वाची आहे, हा विचार केंद्रस्थानी ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा विद्यार्थिनींपर्यंत पोहोचावी आणि आरोग्यविषयक जागरूकता निर्माण व्हावी, हा यामागील मुख्य उद्देश होता.

या उपक्रमाला आरोग्य विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले. आशा सेविका कविता सोनवणे, साधना बाविस्कर, आरोग्य सेविका आरती वंजारी आणि सिस्टर गायत्री पाटील यांनी लसीकरण यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. शाळेच्या पर्यवेक्षिका शीतल कोळी यांनी संपूर्ण नियोजन व आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.

विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा नेहमीच शैक्षणिक उपक्रमांसोबत आरोग्यविषयक उपक्रम राबवत असते, याचाच एक भाग म्हणून हे शिबिर घेण्यात आले.

उपक्रम यशस्वी केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी जळगाव शहर महानगरपालिका, मुलतानी हॉस्पिटल प्रशासन आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!