गोवंश संरक्षणाच्या भूमिकेचे केले स्वागत; महाजन नगर येथे सन्मान सोहळा

मेहरूण : जळगाव शहरात गोहत्या रोखण्यासाठी कठोर कारवाईची भूमिका घेतल्याबद्दल महापौर दीपमाला काळे यांचे श्री महालक्ष्मी मित्र मंडळ, महाजन नगर यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. गोवंश संरक्षणाच्या मुद्द्यावर महापौरांनी घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर मंडळातर्फे त्यांच्याप्रती आदर आणि पाठिंबा व्यक्त करण्यात आला.

श्री महालक्ष्मी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या स्वागत सोहळ्यात महापौर दीपमाला काळे यांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक व धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून परिसरात एकोपा जपणाऱ्या मंडळाने या वेळी गोवंश संरक्षणाच्या विषयाला पाठिंबा दर्शविला.

या प्रसंगी संजय देवरे, अल्पेश देवरे, राजेश बनसोडे, दीपक राजपूत, जय चौधरी, मोंटी राजपूत, लोकेश जंजाळकर, विनोद अस्कर, पवन राजपूत यांच्यासह श्री महालक्ष्मी मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

गोवंश संरक्षण, सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक श्रद्धा यांची सांगड घालत महालक्ष्मी मित्र मंडळातर्फे महापौरांचे स्वागत करण्यात आले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!