मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.
हजारो शेतकरी अडचणीत, 14 प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात यंदा पावसाने दडी मारल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप पिके पूर्णपणे वाया गेल्याने हजारो शेतकरी अडचणीत आले आहेत. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न आणि रोजगार नसल्याने ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुंभकर्णी झोपेत असलेल्या सरकारला जाग करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने 14 ऑक्टोबर रोजी “जन आक्रोश दुष्काळ मोर्चा” काढण्यात येत आहे.
हा मोर्चा शेतकऱ्यांचा, शे-मजुरांचा, शेतकऱ्यांच्या 14 प्रमुख मागण्यांसाठी असून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हक्काचा आवाज दाखवणार आहे. एकदा तरी हा आवाज सरकारपर्यंत पोहोचणारच आहे.
मोर्चाची सविस्तर माहिती:
दिनांक: बुधवार, दि. 14/10/2026
वेळ: सकाळी 11:00 वा.
मार्ग: पैठण गेट ते विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर
मोर्चाचे नेतृत्व:
मा. डॉ. सिरिवेल्ला प्रसाद – प्रभारी, महाराष्ट्र राज्य
मा. हर्षवर्धन दादा सपकाळ – प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
प्रमुख उपस्थिती:
मा. श्री. विजय वडेट्टीवार (विरोधी पक्ष नेते), मा. श्री. अमित देशमुख (माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री), मा. श्री. रविंद्र चव्हाण (खासदार, नांदेड), मा. श्री. बाळासाहेब थोरात (माजी महसूल मंत्री), मा. डॉ. कल्याणराव काळे (खासदार, छत्रपती संभाजीनगर-जालना), मा. डॉ. शिवाजीराव काळगे (खासदार, लातूर) यांच्यासह मोठ्या संख्येने नेते उपस्थित राहणार आहेत.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी 14 प्रमुख मागण्या:
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे न करता सरसकट हेक्टरी रु. 1,00,000/- त्वरित खात्यात जमा करावेत.
मागील व चालू हंगामातील पीक विम्याची नुकसान भरपाई त्वरित वितरित करावी.
सर्व कुटुंबांचे प्रकारचे शेतकरी कर्ज आजपर्यंतचे पूर्णपणे माफ करावे.
फळबागांसाठी हेक्टरी रु. 2,00,000/- (दोन लाख) विशेष मदत द्यावी.
प्रत्येक जिल्ह्यात दुष्काळ निवारण कक्ष सुरू करून तातडीने उपाययोजना करावी.
विहीर/बोअरवेल असलेल्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करू नये, सुरळीत ठेवावा.
शेतकरी-शेतमजुरांसाठी रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करावीत.
दुष्काळग्रस्त भागात पशुधनासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात.
विद्यार्थ्यांची सर्व शैक्षणिक शुल्के माफ करावीत.
NDRF च्या निकषात बदल करून नुकसान भरपाई वाढवावी.
कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात रु. 1,00,000/- त्वरित जमा करावे.
मनरेगाअंतर्गत गावागावात, विहीर, वृक्ष लागवडीस प्रोत्साहन अनुदान तातडीने द्यावे.
आवाहन: छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव, हिंगोली व जिल्ह्यातील सर्व शेतकरी, शेतमजूर, युवा, शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
शेतकरी जगला तरच देश जगेल – जय जवान जय किसान!
