अंबड,जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

अंबड, वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आक्रमक पवित्रा घेतला असून अंबड शहर शाखेने एकाच मोहिमेत तब्बल ५४ वीजचोरांवर फौजदारी कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईने परिसरातील वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

प्रामाणिक आणि नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आली.

कारवाईचा सविस्तर तपशील –

• एकूण आरोपी: ५४ जण • दाखल गुन्हे: ४ स्वतंत्र फौजदारी गुन्हे • पोलीस ठाणे: परतूर पोलीस ठाणे • एकूण वीजचोरी: २१,०३७ युनिट्स • महावितरणचे आर्थिक नुकसान: ४ लाख ८६ हजार ३२५ रुपये

मोहिमेदरम्यान वीजवाहिन्यांवर अनधिकृतपणे आकडे टाकून वीज वापरणे, विजेच्या मीटरमध्ये छेडछाड करणे अशा बेकायदेशीर मार्गाने वीजचोरी सुरू असल्याचे उघड झाले. या प्रकारामुळे महावितरणचा महसूल बुडतोच, शिवाय वीजयंत्रणेवर अतिरिक्त भार येऊन ट्रान्सफॉर्मर जळणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि शॉर्ट सर्किटने आग लागण्यासारखे गंभीर अपघात होण्याचा धोका वाढतो.

अशी झाली कारवाई

जालना-२ विभागाचे कार्यकारी अभियंता विकास आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड शहर शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता लक्ष्मण पुंडे यांच्या नेतृत्वात ही धडक मोहीम राबवण्यात आली.

या पथकात अंकुश दुनगहू, सोमनाथ मुळे, गजानन गोदे, संदीप गाडेकर, पांडुरंग रणमाळे, संतोष राठोड, देविदास काळे, वाल्मीक सांगोळे, एजाज खतीब यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

महावितरणने स्पष्ट केले आहे की, प्रामाणिक ग्राहकांच्या हितासाठी भविष्यातही अशा धडक मोहिमा अधिक तीव्र केल्या जातील आणि वीजचोरांवर कठोर कारवाई सुरूच राहील.

गुन्हे दाखल झालेले ५४ संशयित – सोहेल जाहीर शेख, युसुफ हिराजी बागवान, शेख मीना शेख मुन्ना, नवनाथ निवृत्ती घनाडे, रामा मोरे अंकुश, विठ्ठल रामा उबरे, मनोहर मारोतराव शिंदे, केदार बबन गुंजे, भागवत शिवाजी शिंदे, योगेश ताराचंद राठोड, रमेश गुलाब राठोड, बंडू शंकर आडे, विनायक गंगा राठोड, संदीप शंकर आडे, आकाश सुभाष राठोड, विलास काशीनाथ राठोड, सुनील प्रेमसिंग जाधव, अनिल अर्जुन राठोड, अनिल शिवलाल जाधव, सचिन किसन राठोड, गौरव मोहन जाधव, दत्ता अंकुश आडे, राहुल राजू राठोड, राजेश कान्हेराम जाधव, सुभाष वन्सीराम राठोड, शिवलाल घणा राठोड, मच्छिंद्र कान्हेराम राठोड, दादू खडसे, खदीर गुलाम जिलानी, जहर सादेक हाश्मी, मनोज सवनीस, हाजी बाबामियाँ कुरेशी, राजू अहमद मिर्झा, महमूद नांदवाले, राजू अजमद मिर्झा, युनूस इस्माईल शेख, वसीम जमाल शेख, खिजर सादेक हाश्मी, भागवत खुशालराव बर्डे, पांडुरंग दादू सातपुते, सूर्यकांत रघुनाथ अमीनपुरे, सुनील आसाराम दहिवाळ, संजय बाबू जाधव, बालदेव देवचंद बामणावत, भाऊसाहेब पुराजी राठोड, रामराव घोडेराम जाधव, पांडुरंग जगनीश आढे, जनार्धन सुखलाल चव्हाण, गोविंद सुखलाल चव्हाण, विलास घोडेराम पवार, सुरेश आबादास जाधव, सोपान प्रकाश जाधव, महमद नांदवाले आणि रियाज मिर्झा.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!