कृष्णा अपार्टमेंट परिसर, दशरथ नगर, जळगाव | दिनांक : ११ ते २० ऑक्टोबर २०२५ | वेळ : सायंकाळी ७ ते रात्री १०
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील.
शहरातील दशरथ नगर परिसरात नवरात्रौत्सवनिमित्त यंदाही भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण होणार आहे. युवा दशरथ नगर मित्र मंडळाच्या वतीने या वर्षी एकविरा देवीची विधिवत घटस्थापना करण्यात येणार असून, नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून भव्य दांडिया-गरबा स्पर्धा, दशरा उत्सव आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जपत तयारी सुरू केली असून, श्री एकविरा देवीच्या दर्शनासाठी मंडळाच्या वतीने भव्य दांडिया-गरबा स्पर्धेचे घटस्थापनेसाठी आकर्षक देखावा साकारण्यात येत आहे.
देशीच्या आगमनामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, भाविकांना देवीच्या दर्शनासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे. उत्सवात विविध नृत्यस्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, परिसरातील गरबाप्रेमींना एकत्र येऊन उत्सवाचा आनंद लुटता येणार आहे.
या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दररोज सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना उत्तेजनार्थ आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यामुळे स्पर्धकांचा उत्साह वाढण्यास मदत होणार असून, विविध वयोगटातील नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
पवन रामदास कोळी यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येत असलेल्या या उत्सवात दांडिया-गरबा, दशरा सण आणि इतर विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
नागरिकांना धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनाची अनोखी पर्वणी अनुभवता येणार आहे.
नवरात्रोत्सवात दांडिया आणि गरब्याला विशेष महत्त्व असते. पारंपरिक वेशभूषा, तालबद्ध संगीत, आकर्षक नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक एकात्मतेचा उत्सव आहे. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे परिसरातील युवक-युवतींमध्ये सहकार्य आणि एकतेची भावना अधिक वाढते. याच पार्श्वभूमीवर हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दशरथ नगर परिसरात युवा दशरथ नगर मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात आणि सहभागात साजरा केला जातो. यंदाही मंडळाने नवरात्रौत्सवाची रंगत अधिकच वाढवली असून या परिसरातील नवरात्रौत्सवाची चर्चा सर्वत्र होत आहे.
या संपूर्ण नवरात्रौत्सवासाठी पवन रामदास कोळी यांनी विशेष पुढाकार घेतला असून, त्यांच्या प्रयत्नांतून दशरथ नगर परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
