गावकऱ्यांकडून लाईट पोल व रस्ता डांबरीकरणाची जोरदार मागणी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २, जळगाव अंतर्गत आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२५-२६ मधील महत्त्वाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज नारोद गावात (ता. चोपडा) उत्साहात संपन्न झाला.

कामाचे नाव : नारोद ता. चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे
कामाची अंदाजित किंमत : ५.०० लाख रुपये
या शुभप्रसंगी माननीय आमदार प्रा. श्री. चंद्रकांत बळीराम सोनवणे (चोपडा विधानसभा मतदारसंघ) यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले.

कार्यक्रमात पारंपरिक रीतीने दीपप्रज्वलन, पुष्पहार अर्पण आणि रिबन कटिंग करून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावातील नागरिक, शिवसेना कार्यकर्ते आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नारोद गावातील लोकांमध्ये या विकासकामामुळे खुशीचे लहर पसरले आहे.
काँट्रॅक्टर धुरेश चंद्रकांत पाटील (मो. ९६०७९९९१९२) यांच्यामार्फत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

याच प्रसंगी नारोद गावाचे लाडके आमदार प्रा. श्री. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्याकडे गावकऱ्यांनी आणखी एक महत्त्वाची आणि तातडीची मागणी केली. नारोद गावापासून ते नारोद फाट्यापर्यंत रस्ता डांबरीकरण आणि लाईट पोल बसविण्याची विनंती त्यांनी जोरदारपणे केली.
गावकऱ्यांनी सांगितले की, रात्रीच्या वेळी फाट्यावरून ये-जा करताना संपूर्ण अंधार असतो. विशेषतः महिलांना या अंधारातून प्रवास करावा लागतो, ज्यामुळे त्यांना असुरक्षित वाटते. त्यामुळे लाईट पोल बसविण्याची गरज अत्यंत तीव्र आहे. रस्ता डांबरीकरण झाल्यास वाहतूक सुलभ होईल आणि नागरिकांच्या सुरक्षिततेतही मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी या प्रसंगी सांगितले की, “ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट करणे हे आमचे प्राधान्य आहे. पेव्हर ब्लॉक बसविल्याने गावातील रस्ते सुंदर, स्वच्छ आणि टिकाऊ होतील. गावकऱ्यांच्या लाईट पोल आणि डांबरीकरणाच्या मागणीचा, विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून, गंभीरपणे विचार करण्यात येईल. नागरिकांच्या सोयी आणि सुरक्षेसाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.”
या विकासकामामुळे नारोद गावातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार असून गावाच्या एकूण सौंदर्यीकरणात आणि नागरिकांच्या दैनंदिन सोयीसुविधांमध्ये लक्षणीय वाढ होईल, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.
