मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.

घनसावंगी: तालुक्यातील रहिवासी अनिरुद्ध साबळे यांच्या SBI खात्यातून अज्ञात सायबर भामट्याने १,३४३ रुपये लंपास केले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर तक्रार दाखल केली.

या तक्रारीची सायबर क्राईम विभागाने तातडीने दखल घेतली आणि शॅडो क्रेडिटच्या माध्यमातून कारवाई करत सदर रक्कम गोठवण्यात आली व SBI बँकेने शॅडो क्रेडिट स्वरूपात त्यांच्या खात्यात (A/c XXXX388356) जमा केली.

या यशस्वी कारवाईबद्दल फिर्यादी अनिरुद्ध साबळे यांनी सायबर क्राईम विभागाचे जाहीर आभार मानले आहेत.

यावेळी बोलताना ते म्हणाले, “सायबर क्राईम विभागामुळे माझे पैसे परत मिळाले. त्यांनी अतिशय जलद कारवाई केली. मी त्यांचा मनापासून आभारी आहे.”

तसेच नागरिकांनी कोणत्याही प्रकारची सायबर फसवणूक झाल्यास घाबरून न जाता तात्काळ १९३० वर तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

तक्रार तपशील:

• तिकीट क्र.: 0000001149182212

• पावती क्र.: 31910260221880

• लॉगिन आयडी: AN48622610085147

• बँक: SBI – शॅडो क्रेडिट Rs 1,343/-

SBI SMS संदेश: Shadow credit amount Rs 1,343/- marked in your a/c XXXX388356 for ticket no 0000001149182212

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!