गुप्त माहितीवरून सापळा रचून कारवाई, ग्रामीण भागात अवैध शस्त्र विक्री करणाऱ्या टोळीला अटक

चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा तालुक्यात अवैध शस्त्रांची विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीचा डाव चोपडा ग्रामीण पोलिसांनी उधळून लावला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नाटेश्वर मंदिराजवळ सापळा रचून वाहनांची तपासणी केली असता त्यांच्याकडे तीन गावठी कट्टे आणि आठ जिवंत काडतुसे आढळून आली आहेत.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याकडून काही इसम चोपडा परिसरात गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नाटेश्वर मंदिर परिसरात सापळा लावला होता. संशयित वाहने थांबवून झडती घेतली असता ही शस्त्रे मिळून आली.

या कारवाईत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून शस्त्रे कोठून आणली आणि कोणाला विकणार होते याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात आर्म्स अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या धडक कारवाईमुळे चोपडा तालुक्यातील अवैध धंद्यांना चांगलाच चाप बसला असून नागरिकांनी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!