विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

जळगाव : जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने सप्टेंबर महिन्यात धडक मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत विभागाने तब्बल १९० गुन्हे दाखल करत सुमारे ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जळगाव अपडेट न्यूज साठी निखिल वाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागाने सप्टेंबर महिन्यात एकूण ३,१३५ ठिकाणी छापेमारी आणि तपासणी कारवाई केली. या कारवाई दरम्यान हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे कच्चे रसायन, गुळ-नवसागर मिश्रित रसायन आणि इतर साहित्य जागीच नष्ट करण्यात आले.

जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्यासाठी विभागाकडून सातत्याने शोध मोहीम सुरू असल्याचे सांगण्यात आले. यापुढील काळातही अशा अवैध धंद्यांवर अधिक कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग, जळगावचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!