जळगाव – आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या एकलव्य आघाडीच्या जळगाव जिल्हा सचिव पदी दापोरा (ता.जि. जळगाव) येथील सामाजिक कार्यकर्ते मंगल हिलाल सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.

एकलव्य वंचित आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. अनिल जाधव साहेब यांच्या सूचनेनुसार व प्रदेश उपाध्यक्ष मा. अमितभाऊ तडवी आणि जळगाव पश्चिम जिल्हा संपर्क प्रमुख, निरीक्षक मा. गोरखभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे.
मंगल सोनवणे हे दापोरा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य असून, सदस्य असताना त्यांनी गावाच्या विकासासाठी तसेच आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या घराण्याला आजोबांपासूनच समाजकारणाचा मोठा वारसा लाभला असून, त्यांना समाजकारणाचा दांडगा अभ्यास आहे.
त्यांच्या याच सामाजिक तळमळीची, शिक्षण क्षेत्रातील योगदानाची आणि नेतृत्वगुणाची दखल घेऊन संघटनेने त्यांच्यावर जिल्हा सचिव पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
या निवडीबद्दल दापोरा व परिसरातील आदिवासी बांधवांसह सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. आगामी काळात ते आदिवासी समाजाच्या शिक्षण, रोजगार, स्वावलंबन आणि न्याय हक्कांसाठी अधिक जोमाने काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
समाजबांधव तसेच समाजातील वेगवेगळ्या स्तरातून मंगल भाऊ यांच्यावर पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
