नाशिक जिल्हा प्रतिनिधी

कांदा खरेदी प्रक्रियेत अनियमितता, वजनात फसवणूक किंवा दराबत तक्रार असलेल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाची संधी उपलब्ध करून दिली आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आवाहन केले आहे की, कांदा खरेदी प्रक्रियेसंदर्भातील सर्व तक्रारी 8 ऑक्टोबरपर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात लेखी स्वरूपात सादर कराव्यात.

प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींवर 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे खुली जाहीर सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या सुनावणीत जिल्हाधिकारी स्वतः उपस्थित राहून तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत.

शेतकऱ्यांनी काय करावे?

ज्या शेतकऱ्यांना खरेदीत फसवणूक झाल्याचे वाटते, त्यांनी आपले नाव, गाव, खरेदीची पावती, व्यापाऱ्याचे नाव आणि तक्रारीचा तपशील असले निवेदन 8 ऑक्टोबर सायंकाळपर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जमा करावे.

प्रशासनाने पहिल्यांदाच इतक्या पारदर्शक पद्धतीने खुली सुनावणी आयोजित केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!