कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी माघी पोर्णिमेला सांगली जिल्ह्यातील कडेगांव येथील डोंगराई देवीची यात्रा साजरी करण्यात आली. यात्रेसाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती, 12 फेब्रुवारी हा यात्रेचा मुख्य दिवस होता 11 तारखेपासून भाविक डोंगरावर येऊ लागले होते 12 फेब्रुवारी भंडारा व 13 फेब्रुवारी रोजी शिळा भंडारा आयोजित करण्यात आला, यात्रेच्या दिवशी सकाळपासून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती, सर्वांना सुखी ठेव निरोगी ठेव असे देवीकडे साकडे घालत होते, यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून महाराष्ट्र पोलीस व वन खात्याचे सहकार्य लाभले, यात्रेचे आयोजक A.B.S.S.K समाज डोंगराई देवी विश्वस्त यांनी अथक परिश्रम घेतले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!