राहुरी प्रतिनिधी.

राहुल नवनाथ नजन यांची MPSC मार्फत मंत्रालय महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल राहुरी खुर्द ग्रामस्थांकडून राहुल महाजन यांच्या वर अहील्यानगर जिल्ह्यातील विविध स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामस्थांकडून उद्या दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता राहुरी खुर्द ग्रामपंचायत कार्यालय येथे राहुल नजन यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे.

राहुल नवनाथ नजन यांची मंत्रालयीन सहायक या पदावर नियुक्ती करण्यात आलेली असून यासाठी राहुल महाजन यांनी पूर्व परीक्षा – ३० एप्रिल २०२३ रोजी परीक्षा दिली, यानंतर मुख्य परीक्षा – १७ डिसेंबर २०२३ रोजी दिली. यानंतर कौशल्य चाचणी – ४ जुलै २०२४ झाल्या नंतर याचा निकाल – ११ फेब्रुवारी २०२५ रोजी लागला.

राहुल नवनाथ नजन हे कुंजिरवाडी पुणे येथील रहिवासी असून त्यांचे मूळ गाव राहुरी खुर्द, अहील्यानगर हे आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!