खांडबारा प्रतिनिधी, अफाक खाटीक.

येथील मातोश्री हॉस्पिटल व ओमसाई लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी व सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराचा १०५ रुग्णांनी लाभ घेतला, त्यात १० रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले, २५ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नंदुरबारला संदर्भित केले. यासाठी कांतालक्ष्मी हॉस्पिटलच्या डॉ. अर्चना वळवी उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत ४५ रुग्णांच्या तपासणी करण्यात आली, त्यात ८ रुग्णांना नंदुरबारला पाठवण्यात आले. तपासणीसाठी डॉ. योगेश पटेल होते. याप्रसंगी आदिवासी मौखिक साहित्य परिषदेचे भीमसिंग वळवी, वरुण गावित, खांडबारा उपसरपंच योगेश चौधरी, शैलेश गावित, गणेश पाडवी, सी एन महाले, मगन वढवी, रुबाब खाटीक, अनिल शर्मा आदी उपस्थित होते, यादरम्यान आमदार शिरीष कुमार नाईक यांनी या शिबिरामुळे गोरगरिबांना लाभ मिळत असल्याचे सांगितले व एप्रिल महिन्यात सर्व रोग निदान शिबिर घेण्याची आश्वासन दिले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!