नागरिकांना कायदेशीर हक्क, मोफत विधी सेवा व लोकअदालतीबाबत मार्गदर्शन

जळगाव प्रतिनिधी शाकीर शेख

तालुका विधी सेवा समिती, मुक्ताईनगर आणि तालुका वकील संघ, मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने अंतुर्ली येथे विधी सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून नागरिकांना विविध कायदेशीर बाबी, नागरिकांचे हक्क तसेच उपलब्ध विधी सेवा सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिरात ‘Plea Bargaining’ या विषयावर ॲड. डॉ. उल्हास पाटील व ॲड. प्रफुल्ल किशोर मेढे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विधी सेवा समितीच्या PLV सदस्य जयश्री राजाराम बेलदार व सुष्मिता किशोर सोनटक्के यांची उपस्थिती होती.

यावेळी गावातील एस. एस. भोई सर, पोलीस पाटील किशोर मेढे, पत्रकार शाकीर शेख, भैया करीम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरामध्ये नागरिकांना मोफत विधी सेवा, कायदेशीर हक्क, लोकअदालतीचे महत्त्व तसेच गरजू नागरिकांना उपलब्ध असलेल्या कायदेशीर सहाय्याची प्रक्रिया याबाबत माहिती देण्यात आली. कायद्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि कायदेविषयक जनजागृती निर्माण करणे हा या शिबिराचा उद्देश होता.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत अंतुर्ली यांनी मोलाचे सहकार्य केले. नागरिकांमध्ये कायदेविषयक जागरूकता वाढविण्याच्या दृष्टीने हे विधी सेवा शिबिर महत्त्वपूर्ण ठरले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!